हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने देदीप्यमान यश मिळवल्यानंतर फडणवीसांचे मुंबईतील भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते
फडणवीस म्हणाले, या विजयाने हुरळून जायचे नाही, विजयाने नम्र व्हायचे आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.
विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेला विजय आज साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि या महाराष्ट्रामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज रहा असे फडणवीस यांनी म्हंटल. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुधीर मुंनगंटीवार, केंद्रीयमंत्री कपिल पाटील हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला