व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

संजय राऊत जे बोलतात त्यामुळे आमचं मनोरंजन होत; फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणे वरून भाजपवर टीका करत असतात. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत जे काही वक्तव्य करत असतात त्यामुळे आमचं मनोरंजन होत असत असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. एका मुलाखतीत त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य करताना विरोधकांवर निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, संजय राऊत जे बोलतात त्याने आमचं मनोरंजन होतं. पण माझा सवाल आहे. एखादं वक्तव्य केले म्हणून नारायण राणेंना अटक करायची. जी घटना घडली नाही त्यासाठी आशिष शेलारांवर खटला भरायचा. नितेश राणे यांचं नाव गोवून त्यांना अटक करायची. केवळ मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना राबडी म्हटलं म्हणून 25-25 पोलीस पाठवून त्यांना अटक करायची. पत्रकारांना अटक करायची. हा एजेंसीचा सदुपयोग आहे का असा सवाल त्यांनी केला

अमरावतीमध्ये आयुक्तांवर शाई फेकण्यात आली हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेधच करतो. ते कुणीही केलं असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण जे रवी राणा तिथे नाहीत, त्यांच्यावर तुम्ही कोणत्या अधिकारात ३०७ कलम लावता? त्याच न्यायाने किरीट सोमय्यांवर पुण्यात जो हल्ला झाला, त्यासाठी रवी राणांचा न्याय संजय राऊतांना का नाही?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.