मग 2 वर्ष कुठे झोपला होता; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला आहे.

राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. तसेच, राज्यानेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीचा इम्पॅरिकल डेटा जमा करायचा होता. मात्र, त्यांनी केंद्राकडे बोट दाखवत वेळकाढूपणा केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून याचा जाब सरकारला निश्चितपणे अधिवेशनात विचारणार आहोत, असा इशारही त्यांनी दिला.

या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये ‘रोक’शाही सुरू आहे. ‘रोख’शाहीत प्रत्येक गोष्टीला थांबविले जात आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. स्थगिती, खंडणी, लूट, भ्रष्टाचार हे सर्व प्रकार या सरकारमध्ये पाहायला मिळत आहेत असेही फडणवीसांनी म्हंटल.

Leave a Comment