हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विविध विषयांवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये खडाजंगी होत असते. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांनी भाजपला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही असा टोला फडणवीसांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकक्लकोट इथे विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन झाले. त्यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा”, असं फडणवीस म्हणाले.