हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मविआ सरकार म्हणजे महाविनाश आघाडी सरकार , मद्य विक्री आघाडी सरकार आहे अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे काम राज्य सरकार कडून सुरु आहे असेही फडनवीस यांनी म्हंटल.
राज्य सरकार ला जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. या सरकारने पेट्रोल डीझेल वरील कर कमी केला नाही. मात्र दारू वरील कर कमी केला. कोरोना काळात मंदिरे बंद केली आणि मदिरा चालू होता. विद्यार्थ्यांचे क्लास बंद केलं आणि दारू चे ग्लास सुरू केले. सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री ला परवानगी देऊन महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे काम राज्य सरकारने केले असा आरोप फडणवीसांनी केला.
यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेने वर निशाणा साधला. मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे असे फडणवीस यांनी म्हंटल.
आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला तर आम्हाला महाराष्ट्र द्रोही, मराठी माणसाचे शत्रू असे म्हंटल जात. आणि मुंबईकराना लुटणारे तुम्ही सगळे मराठी माणसाचे दैवत कसे? असा सवाल करत फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.