Wednesday, October 5, 2022

Buy now

आमदारांना 300 घरं बांधून देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारकडून अनेक विधेयके, प्रस्तावास मंजुरी दिली जात आहे. या दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली. ती म्हणजे आमदारांना राहता यावे म्हणून ३०० घरे बांधून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहास मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत एखादे तरी आपले हक्काचे घर असावे असे या याठिकाणी राहणाऱ्या लोकांना वाटत असते. त्या लोकांची ते स्वप्न आमही पूर्ण करणार आहोत. त्यांना त्याची हक्काची घरं आम्ही मिळवून देणार आहोत. लोकांना त्याचे गर मिळावे म्हणून आमच्या सरकारमधील मंत्र्यांनी योजना आणली. या योजना आणल्याबद्दल मंत्र्यांचे आभार मानतो.

खरं पाहिलं तर मुंबई हि सोन्याची कोंबडी आहे. तिचे अंडे दुसरेच नेते आहेत. या मुंबईत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहोत. सेना आमदारांनी गरिबांना व सफाई कामगारांना व सर्वांना घरे असावीत अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर सफाई कामगार, नोकरदारांप्रमाणे सर्वांंना घरं दिली जाणार आहेत. एक गोष्ट सांगतो आघाडी सरकार काम करून दाखवत फक्त घोषणा करत नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.