सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीच्या नादाला लागला? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय तपास यंत्रणेला शिखंडी म्हणत भाजपवर निशाणा साधल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कधीही शिखंडी ला मध्ये घेतल नाही पण तुम्ही कोणत्या शकुनीच्या नादाला लागला? असा सवाल त्यांनी केला. तसेच कपटांनी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. अफजल गुरूला फाशी देऊ नये म्हणून पत्र पाठवणाऱ्या लोकांसोबत आज तुम्ही सत्तेत आहात असेही फडणवीस उद्धव ठाकरे यांना म्हंटल.

खर तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी खरं तर नाटो देशांना मदत मागण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना मदत मागायला हवी होती कारण त्यांच्याकडे एक बॉम्ब आहे जो सर्वांवर भारी आहे तो म्हणजे टोमणा बॉम्ब अशी खोपरखळी फडणवीसांनी मारली. तसेच मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील भाषण हे शिवाजी पार्क वरील वाटत होतं असा टोलाही फडणवीस यांनी लगावला