इतका इगो असेलेलं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिलं नाही ; फडणवीसांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार कडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची विमानप्रवास परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप कडून ठाकरे सरकार वर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं अस म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

फडणवीस म्हणाले, राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अपॉईंट करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर ते GAD ला पत्र लिहितात, ते त्याबाबत ऑर्डर काढतात. मी माहिती काढली, कालच GAD ला परवानगी दिली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचलं. पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

जनता सरकारला सत्तेतून उतरवेल– मुनगंटीवार

राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. अस सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment