हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सातत्याने रंगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही असा दावा त्यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही असे आठवले म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. तर मुंबईत शिवसेनेला हरवणं फार अवघड नाही असेही ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 120 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येणार आहे असे भाकीत त्यांनी केलं.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असा दावा भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची इच्छा नाही. त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे ते आपोआप पडेल.