हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. शिंदे गटासोबतच्या संघर्षात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता उद्धव ठाकरेंचा गड काबीज करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे . त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री केंद्रीय नारायण राणे यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली आहे.
नारायण राणे हे सातत्याने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत असतात. त्यातच आता ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी राणेंकडे देण्यात आली असून ते कामालाही लागले आहेत. नारायण राणे यांचे मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम होत आहेत. तसेच आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातही नारायण राणेंचे संघटनात्मक कार्यक्रम होणार आहेत. नारायण राणेंच्या मदतीने ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हंटल जात आहे.
अंधेरी पोटनिवडणूक : मशाल Vs कमळ!! भाजपकडून मुरजी पटेल अर्ज भरणार
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/WNSYzBJlT7#hellomaharashtra @BJP4Mumbai
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 14, 2022
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका हेच भाजपचे मुख्य लक्ष्य असून त्यापूर्वी होणारी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही दोन्ही पक्षासाठी लिटसम टेस्ट ठरू शकते. शिंदे गट आणि भाजपचे कडवे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यातच आता राणेंवर पक्षाने जबाबदारी सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे आपला गड राखणार की राणे ठाकरेंना अजून धक्के देणार हे आता पाहावं लागेल.