संजय राऊतांनी शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा विडाच उचललाय; पडळकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून लखीमपूर घटनेवर भाष्य करत भाजपवर घणाघात केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या हिमतीची दाद देत त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. एवढच नव्हे तर त्यांनी प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी केली. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय,’ असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

प्रियंका गांधींच्या अटकेनं व संघर्षानं देश खडबडून जागा झाला. ४ ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. चार खून पचवून सुखानं झोपलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची झोप उडवण्याचं काम प्रियंकांनी केलं आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही संवाद वाढताना दिसत आहे. नुकतीच दिल्लीत या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीचा तपशील संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून जाहीर केला होता. त्याचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

Leave a Comment