हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखी विद्यार्थ्यांनी निवडावा असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय.म्हणूनच काय अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते.. असे पडळकरांनी म्हंटल.
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखी विद्यार्थ्यांनी निवडावा असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय.म्हणूनच काय अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते.. अजित पवारांनी ३१ जुलै पर्यंत pic.twitter.com/yIISYP1oT1
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 1, 2021
अजित पवारांनी ३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरू सांगितले होते आणि बाहेर येऊन फक्त आयोगावरील ‘सदस्यांच्या’ जागा भरू असे सांगितले होते… आता ३१ जुलै उलटून गेलीये.. MPSC च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तर सोडाच साध्या MPSC आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्या तरी केल्यात का? असा सवाल पडळकरांनी केला.
#MPSC च्या सर्व जागा भरू सांगितले होते आणि बाहेर येऊन फक्त आयोगावरील ‘सदस्यांच्या’ जागा भरू असे सांगितले होते… आता ३१ जुलै उलटून गेलीये.. MPSC च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तर सोडाच साध्या MPSC आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्या तरी केल्यात का?
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 1, 2021
या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलेलं आहे.. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील या विषयी त्यांना काहीही पडलेलं नाही अशा शब्दांत पडळकरांनी अजित पवार आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.