हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असतानाच आता मागासवर्ग पदोन्नतीच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असं होईल, अशा शब्दात पडळकर यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी आहे का? तर तान्ह्या बाळालाही विचारलं तर तेही सांगेल की हे जातीयवादी आहेत. मागासवर्गाचं दु:ख ज्या प्रतिनिधीला माहिती आहे, अशा व्यक्तीला या उपसमितीचं अध्यक्ष केलं असतं, तर समाजाला योग्य न्याय मिळाला असता. पण अजित पवार मागासवर्गीय पदोन्नतीच्या उपसमितीचे अध्यक्ष होणं म्हणजे मेंढरांचं नेतृत्व लांडग्यानं करावं आणि मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी असं आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
ओबीसी समाजाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी 2006 मध्ये मंत्रिमंडळ उप समिती गठित झाली होती. या समितीने ओबीसीना पदोन्नतीमध्ये 19 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. पण सरकारने अद्याप ती आमलात आणली नसल्याचंही पडळकर याांनी म्हटलंय.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.