‘या’ महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार; नारायण राणेंचं भाकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेत्यांकडून हे सरकार पडण्याची भविष्यवाणी होत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता मार्च मध्ये राज्यात भाजपचे सरकार येईल असे नवीन भाकीत केलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील राणेंनी सरकार पडणार अशी भविष्यवाणी केली होती.

नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही असं राणे म्हणाले.

यापूर्वी देखील राणेंनी केला होता सरकार पाडण्याचा दावा-.

नारायण राणे यांनी यापूर्वी देखील ठाकरे सरकार पडण्याचा दावा केला होता. सर्वप्रथम हे सरकार 11 दिवसात कोसळेल अस राणे म्हणाले होते. मग दिवाळीनंतर , नवीन वर्षांनंतर असे करत करत राणेंची डेडलाईन ही वाढचच चालली आहे.

Leave a Comment