भाजप ही वॉशिंग मशीन, या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो; राष्ट्रवादीचा टोला

malik fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षात असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे हे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. राणे यांनी या भेटीबाबत इन्कार केल्यावरही भाजपच्या लोकांनी हा व्हिडिओ पसरवला.

अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्येही अनेक नेत्यांना भाजपात आणले गेले. ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा वापर करून अनेक नेत्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडले जात आहे किंवा तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे’, असा आरोपच मलिक यांनी केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही असेही त्यांनी सांगितले.