हा काय टीजर होता का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा जाहीर केला नसला तरी त्याबाबत थेट इशारा दिला. येत्या दोन दिवसांत लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

केशव उपाध्ये ट्विट करत म्हणाले, आता अजून कुणाशी चर्चा करणार आहात , घ्या की निर्णय ….नेहमीप्रमाणेच या बाबतीतही निर्णय दिरंगाई. इतक्या महिन्यांत जे नाही झाले ते पुढच्या दोन दिवसांत काय मोठा चमत्कार घडणार आहे. अहो सत्य परिस्थिती, वास्तव काय समोर मांडताय…त्याची सर्वाधिक झळ तर आम्हाला बसतेय. या वास्तवाला जबाबदार कोण ? …चिंताजनक दिशेने तुम्हीच तर ढकलले.करोनाचे अवतार सांगताय पण सरकारचा खरा अवतार जनतेला दिसला.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

तसेच, “हा आजचा काय टीजर होता का ? ससपेन्स कसला ठेवताय आज मी पूर्ण लॉकडाउन घोषित नाही करत पण इशारा देतो ..हे काय आहे. लॉकडाउनला पर्याय अजूनही मिळालाच नाही, मग इतकी हवा कसली तयार केली? गांजलेल्या जनतेला आज ठोस निर्णयाची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे-

रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही. आज मी पूर्ण लॉकडाउनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाउन लागू करत नाही. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाउनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group