हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महापालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. तरच तुमचा भगवा खरा असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर पलटवार करत नाही.सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे मराठीचा ठेका या आपल्याला भ्रमातून बाहेर या अशा शब्दांत निशाणा साधला.
याबाबत केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्ता मिळवून दोन वर्ष होतील. औरंगाबादचं संभाजीनगर झालं नाही. ते कधी होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्याला बांधावर मदत देऊ म्हणाले होते. ती देखील अजून मिळाली नाही.सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे मराठीचा ठेका या आपल्याला भ्रमातून बाहेर या.” केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेनेवर हा निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्ता मिळवून दोन वर्ष होतील
औरंगाबादच संभाजी नगर झाल नाही कधी होणारं?
शेतकऱ्याला बांधावर मदत देऊ म्हणाले होते @OfficeofUT अजून नाही मिळाली.
सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडल आहे त्यामुळे मराठीचा ठेका आपल्याला या भ्रमातून बाहेर या. https://t.co/1D9w7cwpW8— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 8, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले-
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमधील भाजपाच्या विजयानंतर आव्हान देताना संजय राऊत म्हणाले की, “बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात, आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!”