हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले. मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेत की मुंबईचे असा सवाल करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली
मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला. मालमत्ता करमाफीची घोषणा मुंबई सोबत महाराष्ट्रवासीयांसाठी का नाही? इतर महापालिका नगरपालिकांमध्ये मराठी माणूस रहात नाहीत का? मराठी माणसात भेदाभेद कशाला करत आहात? असे एकामागून एक सवाल केशव उपाध्ये यांनी केला.
मुख्यमंत्री @OfficeofUT हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे?
◾️मालमत्ता करमाफीची घोषणा मुंबई सोबत महाराष्ट्रवासीयांसाठी का नाही?
◾️इतर महापालिका नगरपालिकांमध्ये मराठी माणूस रहात नाहीत का?
◾️मराठी माणसात भेदाभेद कशाला करत आहात?— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 2, 2022
उद्धव ठाकरेंनी काय केली घोषणा
मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुंबईतील तब्बल १६ लाख कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे.