खत दरवाढीला शरद पवारांचेच धोरण कारणीभूत; भाजपचा पलटवार

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खतांच्या दरवाढी वरून राजकारण पेटल असतानाच मोदी सरकारने खतावरील (डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवत शेतकऱ्यांना जुन्याच दरात खते देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे केंद्राला मात्र तब्बल १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मात्र DAP दरवाढीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धरले आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की, आता खत दरवाढी विरोधात पत्र लिहीणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालिन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले…” अशी उपाध्येंनी टीका केली आहे.

युपीए काळात ज्यात शरद पवार कृषिमंत्री होते त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी १ एप्रिल २०१० पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे.

आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ययांनी मात्र १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजासोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले असे केशव उपाध्ये यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here