हे तर आरक्षणावर पडदा टाकण्याचे कारस्थान; राम शिंदे यांचा आघाडी सरकारवर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून आज कोल्हापुरात दौऱ्यावेळीही मुख्यमंत्री ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजीही झाली. त्यांनतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपवर आरोप केला आहे. “मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीचे निमित्त मिळाले आहे. मात्र, त्या आडून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पडदा टाकण्याचे कारस्थान केले जात आहे.”

यावेळी भाजपचे नेते शिंदे यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला. ठाकरे सरकारच्या कणाहीन धोरणामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ग्रहण लागले आहे. ठाकरे सकारच्या नव्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा ठाकरे सरकारच्या धरसोडपणामुळे टांगणीवर पडलेला आहे.

या ठाकरे सरकारच्या धोरणशून्य कारभारामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षणदेखील गमावल्याने मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. ठाकरे सरकारकडे धोरण नाही आणि निर्णय घेण्याची हिंमत व क्षमतादेखील नाही, अशीही घणाघाती टीका यावेळी शिंदे यांनी केली.

Leave a Comment