हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्यांनी आता आपला मोर्चा पवार कुटुंबाकडे वळविला आहे. “उपमुख्यमंत्री पवारांनी आपल्या बहिणींबद्दल खोटी माहिती दिली आहे. त्यांच्या बहिणीच्या नावे संपत्ती आहे. अजित पवार व त्यांच्या बहिणींच्या नावे असणाऱ्या बेनामी संपत्तीचे, घोटाळ्याचे चोपडे उद्या ईडी, सहकार विभागाला पाठवणार आहे. यातला एकपण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार यांनी मला सिद्ध करून दाखवावे,” असे चॅलेंज सोमय्या यांनी दिले.
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोलापुरात कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आयकर विभागाने राज्यातील पाच साखर कारखाने यांवर छापा टाकला. यात जरंडेश्वर साखर कारखाण्याचाही समावेश आहे. अजित पवार यांनी त्यांच्या बहिणीच्या नावे अनेक कंपन्या सुरु केल्या आहेत. तरीही ते खोटे बोल्ट आहेत कि माझ्या बहिणींचा काहीही सबंध नाही. वास्तविक खरी गोष्ट हि आहे कि, जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांच्या बहिणी भागीदारी आहेत. २७ हजार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे जरंडेश्वर कारखान्याच्या भेटीवेळी माझ्याकडे आले होते कि अजित पवार जनतेला लुटतायत. आमचा कारखाना अजित पवारांनी घेतला. आणि बेनामी ठेवला.
यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, पवार ठाकरे यांनी गेल्या चोवीस महिन्यात तेवीस घोटाळे केले. ते मी जनतेसमोर ठेवले आहेत. उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावे घेतलेल्या बंगल्याचा हिशोब द्यावा, अशी मागणी यावेळी सोमय्या यांनी केली आहे.