हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. त्यामुळे भाजपवर टीका होत असल्याने याबाबत भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर टीका केली. “अजित पवारांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जरंडेश्वर कारखान्याचे खरे मालक कोण? हे सांगावे. अजित पवारांना कारखान्यावर कारवाई झाल्याने आता साखर कडू लागायला लागली आहे का? असा सवाल करीत सोमय्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यानंतर भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चालवण्यासाठी आहे. मी कारखान्याला नुकतीच भेट दिली. शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला सहकारी कारखाना पवारांनी जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लि. या नावे केला.
वास्तविक या कारखान्याबाबत बोलायचे झाले तर जरंडेश्वर साखर कारखानाचे खरे मालक, चालक, लाभार्थी कोण!? अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी सांगावे, असे आव्हान सोमय्यांनी केले. सोमय्या यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला आहे.