हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक महत्पूर्ण खुलासे केले जात आहेत. साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान सोमय्यांनी आज पुन्हा पवारांवर हल्लाबोल केला आहे. “आज कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार आहे. आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही,” असे सोमय्यांनी म्हंटले आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडून आज पुणे जिल्ह्याचा दौरा केला जाणार आहे. या दौऱ्यावेळी त्यांच्याकडून अजित पवार यांनी कागद दाखविला जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, म्हणाले, “अजित पवारांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले आहेत. त्या घोटाळ्यातून फसवणूक केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार तुमच्यात जर हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा आणि त्यातून काही निष्पन्न झाले तर मला शिक्षाही करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले आहे.