हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे ; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “बावनकुळेंचा हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र आल्यावर सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, हे मांडलेले गणित चुकीचं आहे, हे या निकालामुळं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांचा विजय ही भविष्यातील यशाची नांदी आहे. हा निर्णायक विजय असून भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, माझा विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत त्यांनी आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here