शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आघाडी सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाही; फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकावर टीका केली आहे. आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेकदा छोट्या छोट्या कारणांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापासून अपात्रं केले जाते. ते योग्य नाही. आठवडाभर ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पण या सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाहीन असे फडणवीस यांनी म्हंटले.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कफ परेड येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात आत्महत्या करणाऱ्या तसेच त्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रति आघाडी सरकारने संवेदनशीलता वाढवली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली त्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

पाळीव प्राण्यांमुळे आत्मिक अनुभूती होते. जगातील शहरामध्ये मुंबईची गणना होते. पण आज मुंबईत जागा कमी आहे. मोकळी मैदाने जपणे गरजेचे आहे. कफ परेडमध्ये पाळीव प्राण्यांसाठी जागा देण्यात आली आहे. ही चांगली गोष्ट असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment