हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यांच्याबरोबर तपास यंत्रणेच्या मुद्यांवरून भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक व र्महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “हे सरकारचं ‘वसूली सरकार’ म्हणून ओळखलं जात असल्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ ‘वसूली’ शिवाय यांना काही सुचत नाही आणि म्हणूनच नवाब मलिक यांच्या तोंडून ‘वसूली’ हा शब्द सारखा येताना दिसतोय, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंज माध्यमांशी संवाद साधला. यापूर्वी त्यांनी ट्विटकरीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर टीका केली. “हे सरकारचं ‘वसूली सरकार’ म्हणून ओळखलं जात असल्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ ‘वसूली’ शिवाय यांना काही सुचत नाही आणि म्हणूनच नवाब मलिक यांच्या तोंडून ‘वसूली’ हा शब्द सारखा येताना दिसतोय, असे दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे .
हे सरकारचं 'वसूली सरकार' म्हणून ओळखलं जात असल्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ 'वसूली' शिवाय यांना काही सुचत नाही आणि म्हणूनच @nawabmalikncp यांच्या तोंडून 'वसूली' हा शब्द सारखा येताना दिसतोय. pic.twitter.com/ptOdjkX4yy
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 23, 2021
नवाब मलिक यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांबाबत सांगायचे झाले तर ते अत्यंत बेतालपणे अशी वक्तवे करीत आहेत. या राज्यात, देशात असे कधीच झाले नव्हते कि, एखादा मंत्री, नेता तपास करणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात अशा पद्धतीने कधीच बोलतो. त्यांच्या तपासावर संशय घेत असतो, असे दरेकर यांनी म्हनाले आहे.