Tuesday, January 31, 2023

जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो ना, तेंव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते; चित्रा वाघ यांची घणाघात टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यात आर्यन खान ला सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधन्याय आला. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकार व नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. “जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो ना, तेंव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते,” असे ट्विट वाघ यांनी केले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे, असे वाघ यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

एनसीबीचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून केल्या जात असलेल्या कार्रवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नबाम मलिक हे जास्तच आक्रमक झालेले आहेत. तर त्यांच्याकडून वानखेडे यांना दमही देण्यात आला आहे. तसेच नोकरीवरून पायउतार करणार असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. वानखेडे कुटुंबियांना दिल्या जात असलेल्या त्रासांवरून चित्रा वाघ यांनी आपण तुमच्या पाठीशी असल्याचे म्हंटले आहे.