मलिकांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? आशिष शेलारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गंभीर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणा वरून मलिक यांच्यावरही आरोप केले जात आहेत. यावरून भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप व फडणवीसांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे का? त्यांचा हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला काय? असा सवाल करीत शेलार यांनी टीका केली.

भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांची हतबलता दिसून आली आहे. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे मलिक हे साधा लवंगी फोडू शकले नाहीत. मालिकांची घालमेलता पाहिल्यास असे वाटते कि मालिकांना हायड्रोजन नाही तर ऑक्सिजनची गरज आहे. मुन्ना यादव, हाजी हैदर भाजपचे कार्यकर्ते आहेत, असे मलिक यांनी सांगितले आहे ते खरे आहेत. पण त्यांच्यावर राजकीय गुन्हे आहेत. गुन्हेगारांना राजाश्रय देणे हा मलिकांचा धंदा आहे का?

ज्या रियाज भाटीचा उल्लेख नवाब मलिकांनी केला आहे. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, पंतप्रधान कार्यालयाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही. जर फोटोवरुन संबंध लावायचे असतील तर मग मी तुम्हाला फोटो दाखवतो. रियाज भाटी गायब आहे की पळून गेला आहे. याची माहिती अद्याप नाही. सत्य बाहेर येईल म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला पळवून नेला नाही ना? अशी आम्हाला शंका वाटत असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.

You might also like