हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून अनेक प्रकारची टीका केली जाते. भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “या सरकारला लाज वाटायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असे पडळकरांनी म्हंटले आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्य प्रचार सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्स्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असणार आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते आणि त्यावरुन उस्मानाबादेत दंगे होतात. जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल.असे पडलकरांनी म्हंटले होते.