हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून संप, आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप व महाविकास आघाडी सरकारमधील नेते टीका टिप्पणी करीत आहेत. दरम्यान आज भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकावर घणाघाती टीका केली आहे.
भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत ठाकरे सरकावर आज पुन्हा निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलेला आहे. त्या फोटोत एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माध्यमांशी बोलत आहेत कि, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून खूप प्रयत्न करीत आहेत.
'आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा…@msrtcofficial @CMOMaharashtra #एसटी_कामगार pic.twitter.com/bzbmgh12cT
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 12, 2021
तर दुसरीकडे चित्रामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्यावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून निलंबनाचे पत्र दिले जात आहे, असे ते दिसत आहे,असे चित्र पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. तसेच त्यावर ‘आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा…,अशी टीका केली आहे.