मुंबई । यंदाच्या वर्षी आषाढीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेवरही याचं कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. खुद्द पंढरपूरातील स्थानिकांनाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरप्रवेश नाकारण्यात आला. यावरच टीका करत भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
‘मुख्यमंत्री पंढरपूरात गेले. शासकीय महापूजेचा मान असतो त्यांचा. पण, यांनी काय केलं, दर्शन घेतलं का? विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायांना हात लावला का? गंध लावलं, हार घातला का? नैवेद्य घेतला का, हा तर वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. हे मुख्यमंत्री हिंदू तरी आहेत ना?’, या शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढपूरात जाऊन वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली. पंढरपूरातील एकाही व्यक्तीला मंदिरात जाऊ दिल्ं नाही, एकाही स्थानिक शिवसैनिकाला ते भेटले नाहीत ही बाब अधोरेखित करत, पिंजऱ्यातच पूजा करायची होती तर मग मातोश्रीवरच विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करायची होती असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी मंदिरात गरम होतं म्हणून कारमध्ये येऊन बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तर, चार पावलं पुढे असल्याचा आरोपही राणेंनी यावेळी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”