आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मदती करण्याऐवजी नुसतीच पोपटपंची ; चंद्रकांत पाटील यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून अनेक कारणे शोधत हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्या ऐवजी नुसती पोपटपंची करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका करीत उद्या १ नोव्हेंबर रोजी राज्यभर काळ्या फित लावून सरकारचा निषेध नोंदवन्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आज महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. राज्यातील काबाड कष्ट करणारा शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात 29 अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. एसटी कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगून राज्य सरकारच्या निषेधासाठी सोमवार, 1 नोव्हेंबरला काळी फीत लावूया आणि आंदोलन करूया.,”

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक ययांनाही आव्हान दिले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत.

Leave a Comment