हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित व्यक्ती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत असल्याचा आरोप केला आहे. मलिकांच्या या आरोपांना भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “चेंबूरमधील तो व्यक्ती आमचा मित्रच नाही तर तो कार्यकर्ता आहे. तो दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो. अधिवेशन म्हणजे काय, कुणाचे अधिवेशन, अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? असा सवाल राणे यांनी केला.
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटाला प्रत्युत्तर दिले. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, मंत्री मलिक नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करतोय.
ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. असे म्हणत आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. चेंबूरमधील तो व्यक्ती आमचा मित्रच नाही तर तो कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य चेंबूरमध्ये गेले आहे. तो दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो. भुजबळांना अटक का झाली? भुजबळ तीर्थयात्रेला गेले होते का? ते तर आता फार बोलत आहेत.
चिखली, महाराष्ट्र येथील पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/lTSYGYbALK
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 31, 2021
मलिक यांनी अधिवेशनात भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा हल्लाबोल केला आहे. त्यांना एक सांगू इच्छितो कि अधिवेशन म्हणजे काय, कुणाचे अधिवेशन, अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? आमचेही 105 आहेत. समीर वानखेडेंनी काय केले? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करतात. मंत्र्यांनी हजारो कोटी कुठून आणले? भ्रष्टाचारच केला नाही, त्यामुळे लागू द्या मागे. काही फरक पडत नाही, असे राणे यांनी यावेळी म्हंटले आहे.