रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला. आता 2 वर्ष कुठे आहे पट्ट्या अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी यावेळी टीका केली.

मुख्यमंत्र्यांना उद्देशून, 2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी, असं म्हणत दानवेंनी मुख्यमंत्र्यांना एकेरी संबोधल आहे आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाचे जबाबदार आहेत की 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे, असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री परभणीला आले त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितले कर्ज काढून हॉटेल बांधले. बॅंकवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी. बिना मुख्यमंत्र्याचं कुठं राज्य चालत का, या तीन महिन्यात कोण्या शिवसेनेच्या मंत्र्याला चार्ज दिला असता तर राज्याचा राज्यकारभार नीट चालला नसत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment