आशिष शेलार यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

0
109
Ashish Shelar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयात निनावी पत्र आले असून त्या पत्रातून शेलारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाद्वारे याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये आज सकाळी एक निनावी पत्र आले. या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संबंधित पत्र हे हाताने लिहिण्यात आले असून पत्रात आशिष शेलारांसह भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. या पत्रात आक्षेपार्ह भाषेत काही मजकूर लिहिलेला आहे.

तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून समुद्रात फेकू अशी धमकी याता देण्यात आली आहे. याबाबत आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पत्रासंदर्भात तपास सुरू केला आहे.