हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे. गुरुवारी एकनाथ खडसे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीदायक बातमी समोर येत आहे. शरद पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’