हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.दरम्यान या निवडणुकीत अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.
नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसने थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपने आपले नगरसेवक सहलीवर पाठवले.
मतदान फुटू नये म्हणून भाजपकडून सतर्कता बाळगण्यात आली होती. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले.