हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारकडून मराठा, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल केली जात असल्याने भाजपकडूनही टीका होऊ लागली आहे. दरम्यान, भाजपचे नेते, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “जर महाराष्ट्र सरकारने डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारच्या एकाही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरकू देणार नसल्याचा,” इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सरचिटणीस बावनकुळे यांनी आज मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी टीका करताना बावनकुळे म्हणाले की, या सरकारच्या मनात मराठा, ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे आता आम्ही ठरवले आहे कि, जर राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत इम्पिरिकल डेटा करून जानेवारीपर्यंत आरक्षण दिले नाही तर त्यानंतर राज्यात या सरकारच्या नेत्यांच्या गाड्या अडवल्या जातील.
मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या मनात आरक्षण द्यायची इच्छाच नाही, असे वाटते. या उलट आमच्या सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता. मात्र, या महाविकास आघाडी सरकारकडून जाणीवपूर्वक आरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात, असल्याची टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केली.