हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. “रुपाली चाकणकर आपली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन करते”, असं ट्विट वाघ यांनी केले आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, दोन वर्षापासून BJP ने दिलेल्या लढ्याला यश मिळालं. राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. तसेचं इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
2 वर्षापासून #BJP ने दिलेल्या लढ्याला यश मिळालं
राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला
अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली
मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतेतसेचं इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण अध्यक्षपदासाठी जेव्हा चाकणकरांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी चित्रा वाघ यांनी विरोध केला होता. मात्र, चाकणकरांची निवड झाली असल्याने त्यांचे वाघ यांनी अभिनंदन केले मात्र, भाजपच्या लढ्याला यश आले असे म्हणत राज्य सरकारला टोलाही लगावला आहे.