हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तोकड्या कपड्यांवरून चर्चेत आलेल्या अभिनेत्री ऊर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. वाघ यांनी काही म्हंटल तर उर्फी ट्विट करत लगेच त्यांचा डिवचते. मग पुन्हा वाघ खवळतात. आजही चित्र वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीवर पुन्हा आपला राग व्यक्त केला. “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. जेवढा दम असेल तो लावावा. मी काहीही झालं तरी महाराष्ट्रात नंगानात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. मी एकाकी पडले नाही. महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे, असा थेट इशारा वाघ यांनी यावेळी उर्फीला दिला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, उर्फीच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. तिने याठिकाणी काही पानचट म्हणावं आणि आमच्या मुलांचे फोटो व्हायरल करायचे, असे प्रकार सुरु आहेत.
यावेळी चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, आमच्यावर टीका करून पोट भरले नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबावर आलात. आमचा मुलांचा राजकारणासोबत काडीचा देखील संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं काय म्हणावं तुम्हाला. मी आधी आई आहे. मला मुलं आहे. तुम्ही आमच्या मुलाचे फोटो व्हायरल केले आहेत. तुम्हाला काहीच इथिक्स राहिले नाहीत.
तुमचं प्रोफेशन आहे, त्यापद्दतीने पेहराव करा. केवळ चिंध्या लावून फिरतायत. ती एवढी निर्लज्य आहे की म्हणते माझा हा भाग दिसला आणि हा भाग दिसला नाही. तर कारवाई होणार, हे कुठली बाई बोलू शकते, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.