मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मागच्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यांनतर अनेक स्तरातून शिंदेवर (Eknath Shinde) अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना बाहेरून पाठिंबा देईल असे जाहीर केलं. यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ‘देवेंद्र फडणवीसांना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय’ असे ट्वीट करत महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.
१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून @Dev_Fadnavis जीं ना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय !#अकेला_देवेंद्र #उखाड_दिया #Devendra4Maharashtra pic.twitter.com/Xs9XaPKOb5
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2022
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली.
शिंदेंनी मानले फडणवीसांचे आभार
भाजपाने आम्हाला साथ दिली. संख्याबळ असूनही त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. तर बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिलं. हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले आहे.
हे पण वाचा :
शिवसैनिकाची थेट बंडखोर आमदाराच्या फेसबुक पेजवरुन खळबळजनक पोस्ट; अकाऊंट हॅक केलं?
हो, फडणवीसांनीच आम्हांला संरक्षण दिले- दीपक केसरकर
Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या
PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!