हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री अनिल परब व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” परिवहनमंत्री अनिल परब हे आपल्या शब्दावरून पलटी मारत आहेत. शब्द न पाळणारं.….पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार आहे, अशी टीका वाघ यांनी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अनिलजी परब यांनी एकेकाळी म्हंटले होते कि आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. अनिल परबजी, किती खोट्या शपथा अन् वचनं घेणार आहात. थोडी फार उरली असेल तर शब्दाला जागा. तुम्ही आपल्या शब्दावरून पलटी मारताय. शब्द न पाळणारं.पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार आहे, असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
अनिलजी परब काय म्हणाले ते ऐका…
अनिल परब जी,किती खोट्या शपथा अन् वचनं घेणार…
थोडी फार उरली असेल तर शब्दाला जागा…तुम्ही आपल्या शब्दावरून पलटी मारताय…
शब्द न पाळणारं.….पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार आहे…@advanilparab @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis pic.twitter.com/jiVCaeB8ER— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 13, 2021
दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यापूर्वीही ट्विट करीत ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यांनी यापूर्वी म्हंटले होते की, ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय. नोकरी घालवणं, उपाशी मारणं, बेघर करणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं हाच का महाविकास आघाडी सरकारचा कॅामन मिनिमम प्रोग्राम आहे का? हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय. निलंबन सरकारचा धिक्कार असो !, असे वाघ यांनी म्हंटले होते.