महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !; चित्रा वाघ यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. या आंदोलनावरून भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !.” अशी टीका वाघ यांनी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आर्यन खानच्या दिमतीला लागणारं सरकार पोलिसांची ढाल करून एसटी कर्मचा-यांना दंडुक्याची भिती दाखवते. लोकशाही मार्गानं सुरू असलेलं आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सरकार आपल्याच कर्मचाऱ्यांना का घाबरतंय ? शिवशाही नाही मोगलाई सुरू आहे हे. हम करे सो कायदा चालणार नाही.

भूमिपूत्रांना नोकरी देण्याच्या बाता मारणा-या शिवसेनेनं नोकरी तर दिलीच नाही उलट मराठी ST कर्मचाऱ्यांची नोकरी घालवण्याचं पाप केलं आहे. शिवसेनेनं भूमिपूत्रांवर अन्याय केलाय. मराठी जनतेसाठी आजचा काळा दिवस आहे. महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !,” अशी टीका वाघ यांनी केली आहे.