हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे. या कायद्यामुळे राज्यातील महिलांना एका अर्थाने सुरक्षा कवच मिळाले आहे. मात्र, शक्ती कायद्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. शक्ती कायद्यात महिलांनाही आरोपीच्या कक्षेत गणलं जाणार आहे. त्यामुळे हा शक्तीकायदा नेमका कुणाला शक्ती देणारा आहे?, असा टोला वाघ यांनी लगावला आहे.
वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, शक्ती कायद्यात महिलांनाही आरोपीच्या कक्षेत गणलं जाईल असं समजत आहे. लैंगिक छळ किंवा अत्याचारात केंद्रस्थानी महिला असते. सत्ताधाऱ्यांचा प्रभाव पोलिसांवर असल्याची अनेक उदाहरणं आहेत. जर धाकदपटीने महिलेचा आवाज दाबला गेला तर चौकशी एकतर्फी नसेल का? हा शक्तीकायदा नेमका कुणाला शक्ती देणारा? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी महत्वाच्या अशा शक्ती कायद्यायला मंजुरी देण्यात आली. राज्यात महिला, मुली यांची फसवणूक करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, ॲसिड हल्ला होणे अशा होणाऱ्या विविध गुन्हयांमध्ये आरोपीना कडक शिक्षा होण्यासाठी नवा कायदा आणण्यात आला. या कायद्याच्या शिक्षेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत सरकावर निशाणा साधला आहे.
शक्ती कायद्यात महिलांनाही आरोपीच्या कक्षेत गणलं जाईल असं समजतयं
लैंगिक छळ किंवा अत्याचारात केंद्रस्थानी महिला असते..
सत्ताधा-यांचा प्रभाव पोलिसांवर असल्याची अनेक उदाहरणं आहेत जर धाकदपटीने महिलेचा आवाज दाबला गेला तर चौकशी एकतर्फी नसेल का? हा शक्तीकायदा नेमका कुणाला शक्ती देणारा.. pic.twitter.com/ShpGU8WHIB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 24, 2021
नुकतीच मंजुरी देण्यात आलेल्या शक्ती कायद्यात समाजमाध्यमांवर महिलांची बदनामी, अॅसीड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत. तर सारे खटले एका महिन्यात निकाली काढणे, प्रत्येक जिल्ह्य़ात स्वतंत्र तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालये स्थापन करणे या गोष्टींचा समावेश आहे.