हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. “अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.
आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. pic.twitter.com/2OBMkam9Ph— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2021
महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली.