खडसेंनी केली पवारांची पाठराखण ; म्हणाले बँक घोटाळ्याशी पवारांचा काय संबंध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या संदर्भात काल ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून राज्यभर भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. याच संदर्भात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आपण विरोधी पक्ष नेते पदावर असतानाच या प्रकरणाला सुरुवात झाली. या प्रकरणाच्या संदर्भात आपण विधानसभेत जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे या प्रकरणाची मला संपूर्ण माहिती आहे. परंतु या प्रकरणाचा शरद पवारांशी कसलाही संबंध नाही असे विधान एकनाथ खडसे यांनी केल्याने आता राष्ट्रवादीला भाजपवर टीका करण्यासाठी अधिकच बळ मिळाले आहे.

दरम्यान, मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. महिनाभर मुंबईत नसणार आहे. त्यामुळे मी २७ सप्टेंबर रोजी मुंबई मधील ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना माहिती देणार आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या कृतीने राज्याचे राजकारण अधिकच तापणार आहे असेच एकंदर चित्र बघायला मिळते आहे.