मलिकांचे फडणवीसांवरील आरोप म्हणजे नुसता हवेत गोळीबार; गिरीश महाजनांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक व भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर आरोप केले जात आहेत. फडणवीसांवर केल्या जात असलेल्या आरोपावरून नवाब मलिक व शिवसेनेवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांचे फडणवीसांवर आरोप म्हणजे नुसता हवेत गोळीबार आहे, अशी टीका महाजन यांनी केली आहे.

माजी मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मलिक यांनी आपण पत्रकार परिषदेत घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडू असे सांगितले होते. मात्र, त्यांनी जो बॉम्ब टाकला आहे. तो इतका फुसका आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप हे निव्वळ हवेत गोळीबार आहे. मी मलिक यांना आव्हान करतो कि त्यांनी पुराव्याचा एक तरी दाखवावा. नुसता हवेत गोळीबार करू नये.

मलिकांकडून भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत ते केवळ आपल्या स्वार्थासाठी ते आरोप करत आहे. मलिक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, आर्यन खान किती चांगला व हर्बल तंबाखू किती छान हे सांगण्यापेक्षा त्यांनी जनतेकडे लक्ष द्यावे, असे महाजन यांनी यावेळी सांगितले.