मुंबई प्रतिनिधी | आज मुंबईमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षांची आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. युती झाल्यास आमचाच मुख्यमंत्री असेल असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्याच बरोबर शिवसेनेच्या कंकूवत जागा निवडून आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे भाजपचं राज्यात मोठा भाऊ आहे असे महाजन म्हणाले आहेत.
राज्यात युती झाल्यास आमचाच मुख्यमंत्री होणार. कारण भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी जनतेची भावना आहे. त्यामुळे येत्या निवडणुकी नंतर भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. तर त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून खरपूस समाचार घेतला जाणार हे मात्र निश्चित आहे. कारण शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आगामी काळात नाकारता येणार नाही. त्यामुळे भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून कलगी तुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.