हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यात भाजप नेते किरीट सोमय्यांकडून कारखान्यासंदर्भात माहिती काढून घोटाळे उघडकीस आणले जात आहे. दरम्यान ते जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळा बाहेर काढत असून कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट आरोप केला. जरंडेश्व्रर साखर कारखान्यासारखाच जालना कारखान्यात घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार यांच्या आग्रहानेच त्याचा रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न झाला, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे की, ‘शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने, फसवणूक करून खरेदी करीत शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयांची जमीनही बळकविण्याचा खोतकर यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाला आहे. खोतकर यांनी मुळे परिवारासोबत हातमीळवणी करून कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तसेच यामागे शरद पवार यांचाही हात असून त्यांच्या आग्रहाने हा रिपोर्ट दाबण्यात आला आहे, असाही आरोप सोमय्यांनी केला आहे.