हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत व कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद होत आहेत. अशात राऊतांनी मंत्री राणेंवर टीका केल्याने त्यानंतर भाजप नेते प्रमोद जठार यांनीही राऊतांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. “दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे राणेंनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून नारायण राणेंवर घणाघाती टीका केली जात आहे. आज त्यांनी नाशिक येथील दौऱ्यावेळी एक महत्वपूर्ण विधान केले. “अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू, असे राऊतांनी म्हंटले. त्यावर आता निलेश राणेंनी पलटवार केला असून “संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा राणे यांनी दिला.
दरम्यान आज दिवसभरात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत व कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्यातील आरोप, टिकेचे, वादाचे हल्ले-प्रतिहल्ले कार्यकर्त्यांनी पाहिले. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वपूर्ण विधान वापरून राणेंवर निशाणा साधला आहे.